हलकर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य अजळकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर निवड - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2023

हलकर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य अजळकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर निवड

 हलकर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य अजळकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर निवड

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        हलकर्णी (ता.चंदगड) येथील दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर सदस्य म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी नियुक्ती केली आहे. त्याबददल प्राचार्य डॉ. अजळकर यांचा  दौलत विश्वस्थ संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळीअध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील उपस्थित होते. प्राचार्य डाॅ. अजळकर यांना केशव गोईलकर डॉ. चंद्रवदन नाईक यांचे सहकार्य लाभले.No comments:

Post a Comment