हलकर्णी महाविद्यालयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2023

हलकर्णी महाविद्यालयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

     छत्रपती संभाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांच्या सारखा स्वाभिमानी राजा सापडणे दुर्मीळच.आपल्या पावणे नऊ वर्षाच्या अतिशय कमी कारकिर्दीत अनेक लढाया जिंकणारे व एकाही लढाईत पराभव नपत्करणारे ते एक दिग्वीजयी राजे होते. छत्रपती संभाजी महाराजांनी प्रजाहितदक्ष राज्यकारभार करून आदर्श शासनव्यवस्था निर्माण केली महान योध्दे, श्रेष्ठ साहित्यिक व उत्कृष्ठ प्रशासक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना गौरविले जाते. स्वराज्याच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या पाच आघाडयावर विजय मिळवित दिल्ली वर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहणारे ते एक महान राजे होत. आपल्या ध्येयाचा सातत्याने पाठ पुरावा व आकमक पवित्रा ही महत्वाची युध्द शास्त्रातील तत्वे आचरणात आणुन शत्रूवर विजय मिळविले. आयुष्यभर ते स्वराज्यासाठी व सर्वसामन्यांच्या हितासाठी झटत राहिले त्यांचे हे कार्य भावी पिढीला समजावे म्हणुन हलकर्णी महाविद्यालयामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. 

      कार्यक्रमाचे आयोजन व स्वागत प्रा. मधुकर जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. ए. व्ही. दोरूगडे, डॉ. सी. बी. पोतदार, डॉ. जे. जे. व्हटकर, डॉ. एस. आर. वायकर, प्रा. ए. एस. जाधव, प्रा. एस. एन. प्रा. के. एम. गोनुगडे, प्रा. जी. पी. कांबळे, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. ज्ञानेश्वर पाटील, प्रा. आर. बी. गावडे, प्रा. जी. जे. गावडे, प्रा. डी. जे. भुईटे, प्रा. एन. एम. कुचेकर, प्रा. शाहू गावडे, महाविद्यालयाचे अधिक्षक प्रशांत शेंडे, बी. बी. नाईक, गोकुळ मोरे, सुधीर गिरी, श्रीपती कांवळे, सुरज जाधव, युवराज रोड, नंदूकुमार वोकडे,  अल्ताफ मकानदार, परसू नाईक, संदिप पाटील, मनोहर कांबळे, सौ. माधुरी पाटील आदि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्म उपस्थित होते.


No comments:

Post a Comment