संग्रामसिंह कुपेकर यांचा अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2023

संग्रामसिंह कुपेकर यांचा अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश

मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत संग्रामसिंह कुपेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
        शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर गेल्या काही महिन्यापासून राजकीय दृष्ट्या तळ्यात मळ्यात असणारे शिवसेना चंदगड विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर अखेर आज भारतीय जनता पक्षात अधिकृत रित्या दाखल झाले.  त्यांनी यापूर्वी जि. प. सदस्य व बांधकाम समिती सभापती म्हणून काम केले होते. गत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. तथापि भाजप- शिवसेना युती असूनही चंदगड मतदार संघात भाजपकडून बंडखोरी झाल्यामुळे निवडणूक जिंकण्यात ते अपयशी ठरले होते. 
  गेल्या सहा महिन्यात त्यांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ भूमिका घेतली होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट सोडून अन्यत्र जातील असा अंदाज होताच. अखेर मंगळवार दिनांक १४ मार्च २०२३ रोजी आपल्या समर्थकांसह त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंग घाटगे, चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील आदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.
   यावेळी भैय्यासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, संतोष मळवीकर, दिगंबर देसाई, आनंदराव देसाई, बंडोपंत राणे, तानाजी पाटील, शेखर गावडे, डॉ. अनिल पाटील, प्रमोद कांबळे, सचिन सातवणेकर, अजय कदम, अमृत जत्ती, प्रभाकर देसाई, मारुती कदम, एन. डी. कांबळे, आनंदराव मटकर बाळू मनगुतकर, राजू यादव आदी कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment