निट्टूरात २२ रोजी जंगी कुस्ती मैदान, प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र विरुद्ध पंजाब मध्ये मल्लयुद्ध - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2023

निट्टूरात २२ रोजी जंगी कुस्ती मैदान, प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र विरुद्ध पंजाब मध्ये मल्लयुद्धकालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 
         ८० वर्षांची परंपरा असलेल्या निट्टूर, ता. चंदगड येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र विरुद्ध पंजाब लढत रंगणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त दि. २२ मार्च २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता ग्रामस्थांच्या वतीने हे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. नरसिंह मंदिर शेजारील आखाड्यात  प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण विरुद्ध पंजाब केसरी रिंकू खन्ना यांच्यात द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन भैय्या पवार विरुद्ध गुत्ताप्पा काटे कर्नाटक केसरी यांच्यात तर किर्तीकुमार बेनके विरुद्ध हरियाणा केसरी राकेश कुमार यांच्या तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती रंगणार आहे. 

      याशिवाय अनुक्रमे ओमकार पाटील मोतीबाग विरुद्ध रोहित कंग्राळी, राजवर्धन मोतीबाग विरुद्ध विक्रम शिनोळी, भाऊ पाटील राशिवडे विरुद्ध कामेश कंग्राळी, किरण शेंडगे शाहू आखाडा विरुद्ध रवी केंपन्नावर दर्गा तालीम,  शुभम पाटील तेऊरवाडी विरुद्ध सुमित कडोली, अमोल नरोटे शाहू आखडा विरुद्ध विक्रम गावडे तुर्केवाडी, पिंपळ घुले शाहू आखाडा विरुद्ध संकल्प येळवे कंग्राळी, गणेश मलतवाडी विरुद्ध शुभम पाटील कंग्राळी, तात्या घुले शाहू आखाडा विरुद्ध गौस दर्गा तालीम, कार्तिक जाधव निट्टुर विरुद्ध सोपान दळवी तुर्केवाडी आदी ५२ काटा जोड कुस्त्या शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडतील. 
     आखाडा पूजन माजी कुस्तीगीर नागोजी रामू पाटील तर फोटो पूजन सतबा कल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी रॉयल क्लासेस चे युवराज पाटील, सरपंच गुलाब पाटील, शिक्षक नेते  शंकर मनवाडकर, पोलीस पाटील यल्लाप्पा पाटील, दयानंद सलाम, गोविंद पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. मैदानात भीमा कुरबुर अनगोळ यांच्यावतीने जंगी  मेंढ्यासाठी सालाबाद प्रमाणे जोड पाहून कुस्ती लावण्यात येणार आहे. कुस्त्यांचे धावते समालोचन कृष्णात चौगुले व हलगी सम्राट हनुमंत घुले यांची रणहलगी मैदानाचे आकर्षण ठरणार आहे. 
     पंच म्हणून पै मारुती गावडू पाटील, गावडू निंगापा पाटील, भैरू पाटील, नागोजी साळुंखे, भरमू पाटील, विजय पाटील, नरसू पाटील, कल्लाप्पा पाटील हे काम पाहणार आहेत. होतकरू पैलवान व कुस्ती शौकिनांनी मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक नेत्रपाल हडलगेकर, यल्लाप्पा चांगोजी पाटील, भारत खवणेवाडकर, महादेव पाटील, बाळू जाधव आदींनी केले आहे.


No comments:

Post a Comment