अडकूर ग्रामपंचायतीने करवसूलीसाठी बनवला क्यूआर कोड - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2023

अडकूर ग्रामपंचायतीने करवसूलीसाठी बनवला क्यूआर कोड

क्यू-आर कोडचे अनावरण करताना मान्यवर

अडकूर /सी. एल. वृत्तसेवा
अडकूर (ता. चंदगड) ग्रामपंचायतीने कर पाणी पट्टी व घरपट्टी वसूलीसाठी क्यू आर कोड बनवला आहे.
  आज मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात या क्यू आर कोडचे अनावरण करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान वापर करून ऑन लाईन पद्धतीने जास्तीत जास्त कर वसूली चा प्रयत्न ग्रामपंचायत करणार आहे. यावेळी शिवराज देसाई, अभिजित देसाई, अल्ताफ चिंचणीकर, ग्राम सेवक डी. आर. घाडगे, डाटा ऑपरेटर शिरिन शेख व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment