पाटणे जवळ आंबा, काजू, चिकू बागेला आग, ठिबक सिंचनही भस्मसात, सोनार कुटुंबियांचे लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2023

पाटणे जवळ आंबा, काजू, चिकू बागेला आग, ठिबक सिंचनही भस्मसात, सोनार कुटुंबियांचे लाखोंचे नुकसान

आगीत भस्मसत झालेल्या आंबा, काजू, चिकु बागेत हताशपणे उभे असलेले वसंत सोनार सोबत अन्य शेतकरी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
  पाटणे (ता. चंदगड) नजीक मोटनवाडी गावाच्या हद्दीत अज्ञात समाजकंटकाने लावलेल्या आगीत तीन एकर बागेतील काजू, आंबा, चिक्कूची शेकडो झाडे, मेसकाठी- बांबू बागेसह ठिबक सिंचन सिस्टीम भस्मसात झाली.
   मोटनवाडी हद्दीत सध्या पाटणे (मुळगाव कालकुंद्री) येथील रहिवासी वसंत बाळकृष्ण सोनार-कालकुंद्रीकर व कुटुंबीयांनी स्व- मालकीच्या गट नंबर २११ मध्ये वरील प्रमाणे झाडांच्या बागेत ठिबक सिंचन सिस्टीम बसवली होती. उजाड माळरानावर महत्प्रयासाने जतन करून वाढवलेल्या या बागेला चार दिवसांपूर्वी भर दुपारी अज्ञात समाजकंटकाने आग लावली. आग लागल्याचे दिसतात शेजारील शेतकरी आग विझवण्यासाठी धावले. 
   तथापि उन्हाचा तडाखा व वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण  केल्याने आग आटोक्यात येऊ शकली नाही. परिणामी तीन एकर परिसरातील संपूर्ण आंबा काजू चिकूची कलमी झाडे, मेस काठी बेटे व ठिबक सिंचन प्रणाली पाईप सह जळून खाक झाली. यात कालकुंद्रीकर-सोनार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शासकीय स्तरावरून अशा समाजकंटकना शोधून अद्दल घडवण्याबरोबरच सोनार कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment