होसूर सीमेवर अज्ञातानी टाकला मृत बैल, मंगळवारी भर दुपारची घटना - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2023

होसूर सीमेवर अज्ञातानी टाकला मृत बैल, मंगळवारी भर दुपारची घटना


कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

 होसूर (ता. चंदगड) येथील सीमेवर कोवाड ते बेळगाव रस्त्यावर मंगळवारी दुपारच्या सुमारास अज्ञात वाहनातून मृत बैल टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे ग्रामस्थांनी बघण्यासाठी गर्दी केली होती अचानक जाता जाता मृत बैल कोणी टाकला याबद्दल तर तर्क वितर्क सुरू आहेत. चंदगड परिसरातून बेळगाव येथे जनावरांची वाहतूक केली जाते. अशा वाहनातून मृत बैल टाकण्यात आला असावा अशी चर्चा सुरू आहे. या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.No comments:

Post a Comment