वेशांतर करून चंदगडचे पोलीस निरीक्षक घोळवे यानी पकडले मटका एजंटाना - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2023

वेशांतर करून चंदगडचे पोलीस निरीक्षक घोळवे यानी पकडले मटका एजंटानाचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालूक्यातील तडशिनहाळ व यशवंतनगर येथे मटका घेत असल्याची खबर मिळताच वेशांतर करून चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी मुंबई नावाचा मटका घेताना दोघांना रंगेहाथ पकडले. तडशिनहाळ फाटा येथे शांती प्रकाश आर्ट्स जवळ असलेल्या काजू बागेत मुंबई मटक्याच्या चिठ्या घेताना कृष्णा नामदेव चांदेकर (वय २९ वर्ष, रा तडशिनहाळ) याला रंगेहाथ पकडून त्याच्याजवळील ८२३ रुपये ४० हजार रूपये किमतीची (एम एच ०९, एफजी ३२८०) ही एच एफ डिलक्स ही दुचाकी गाडी असा ४० हजार ८२३ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तर यशवंतनगर येथे चाळोबा चिमाजी शंभूचे (वय वर्ष ५४ रा यशवंतनगर) हा बुकी मालक जोतिबा पारसे (रा. माडवळे) यांच्या व स्वताच्या फायद्या करिता मुंबई नावाचा मटका घेताना  १०७४ रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन या तिघांवर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
No comments:

Post a Comment