हलकर्णी येथील कु. सलोनी वाईंगडे हिची ज्युनिअर असोसिएटपदी अभिनंदनीय निवड - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2023

हलकर्णी येथील कु. सलोनी वाईंगडे हिची ज्युनिअर असोसिएटपदी अभिनंदनीय निवड

कु. सलोनी हिचे अभिनंदन करताना आई-वडील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

      हलकर्णी (ता. चंदगड) येथील विलास वाईंगडे यांची कन्या कु. सलोनी विलास वाईंगडे हिची बँकिंग क्षेत्रातील परिक्षा देऊन मिळवलेल्या यशामूळे देशातील अग्रगण्य बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्युनिअर असोसिएटपदी निवड झाली आहे. 

    कु. सलोनी हीने बारावी पर्यंतचे शिक्षण गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी येथे घेतले असून के. आय. टी. कॉलेज कोल्हापूर येथून बी. ई. (सिविल) ही पदवी संपादीत केली आहे. एक अभ्यासू, जिद्दी आणि होतकरू अशी तिची प्रतिमा आहे. तिने मिळवलेल्या या दैदीप्यमान यशामुळे तिची आई सौ. मंगल व वडील विलास वाईंगडे यांच्या कष्टाचे सार्थक झाले असून सर्व थरातून तिचे अभिनंदन होत आहे.No comments:

Post a Comment