मागण्या मान्य होईपर्यंत संप चालू ठेवण्याचा चंदगड तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा निर्धार - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2023

मागण्या मान्य होईपर्यंत संप चालू ठेवण्याचा चंदगड तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा निर्धार

हलकर्णी येथील शिक्षक बँक शाखेत समन्वय समिती बैठकीत विचार मांडताना सरस्वती विद्यालय कालकुंद्रीचे मुख्याध्यापक सुभाष बेळगावकर सोबत आणि शिक्षक व इतर विभागाचे कर्मचारी.
 कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   जुनी पेन्शन मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप यापुढेही मागण्या मान्य होईपर्यंत नेटाने चालवण्याचा निर्धार 'चंदगड तालुका कर्मचारी समन्वय समिती'ने जाहीर केला आहे. आज सर्व विभागातील प्रमुखांची बैठक शिक्षक बँक शाखा हलकर्णी येथे पार पडली. त्यामध्ये ही भूमिका जाहीर करण्यात आली. 
   यावेळी झालेल्या चर्चेत संप यशस्वी करण्यासाठी कोवाड कारवे व चंदगड येथे विभागवार सर्व कर्मचाऱ्यांनी रोज सकाळी ८.०० वाजता एकत्र येण्याचे ठरविण्यात आले. केंद्र शाळा कोवाड येथे कालकुंद्री, कुदनूर व कोवाड केंद्रातील, कारवे येथील सेवानिवृत्त शिक्षक विरंगुळा केंद्रात कारवे, तुडिये, हलकर्णी, माणगाव, मांडेदुर्ग केंद्रातील तर उर्वरित सर्व केंद्रातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक तसेच अन्य सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती चंदगड येथे उपस्थित राहण्याचे ठरवण्यात आले. 
   बैठकीस कोवाड विभागातून सुभाष बेळगावकर, अशोक नौकूडकर, एस टी कदम, शशिकांत खोराटे, बळवंत लोंढे, गोविंद पाटील, शैलेश वाघमारे. कारवे विभागातून धनाजी पाटील, शिवाजी पाटील, प्रकाश बोकडे, तानाजी नाईक, शाहू पाटील, आर बी गावडे, बाळू प्रधान, आर के शिंदे. दाटे-चंदगड विभागातून बाबुराव परीट, सदानंद पाटील, गोपाळ जगताप, प्रकाश पाटील, आनंदा कांबळे, सट्टूपा फडके, विनायक गिरी, यु एन पवार, पी एस मगदूम आदी शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
  नियोजित तिन्ही केंद्रांवर संपातील सर्व कर्मचाऱ्यांनी  संप सुरू असेपर्यंत रोज उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.No comments:

Post a Comment