विद्या बांदिवडेकर यांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

12 March 2023

विद्या बांदिवडेकर यांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार

 

कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनात माजी प्राचार्या सौ विद्या बांदिवडेकर यांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार प्रदान करताना अप्पर पोलीस अधिक्षक देसाई, बाजुला साहित्यिक पेंडसे, ॲड.रोटे,डाॅ चोपडे आदी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

 "स्त्रियांना विकासाची संधी दिल्यास समाजाचा विकास होतो. सकारात्मक विचार केल्यास यश हमखास. स्त्रियांनी चांगले संस्कार केल्यास भावी पिढी घडेल. स्त्रीयांना प्रत्येक क्षेत्रात करियर करण्याची संधी आहे. म्हणून खऱ्या अर्थाने जो समाज स्त्रीयांचा सन्मान करतो तोच प्रगती करतो. " असे प्रतिपादन कोल्हापूरच्या अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांनी केले. 

८ मार्च महिला दिनानिमित्त महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा  राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान पुरस्कार कार्यक्रमात जयश्री देसाई प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

शिक्षण क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा, माजी प्राचार्या सौ. विद्या राजाराम बांदिवडेकर यांना ८ मार्च महिला दिनानिमित्त महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा  राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान पुरस्कार शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूरच्या अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते देण्यात आला. सौ. बांदिवडेकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिका सूजाता पेंडसे, अॅड. मनिषा रोटे, डॉ. पूजा चोपडे, प्राचार्य एस. पी. बांदिवडेकर, अॅड. आर. पी. बांदिवडेकर, एस. व्ही. गुरबे, एन. डी. देवळे, संजय पाटील, अरूण पाटील, टी. एस. चांदेकर उपस्थित होते.No comments:

Post a Comment