चंदगड एस. टी. आगार प्रमुख निकम यांची तडकाफडकी बदली - चंदगड लाईव्ह न्युज

12 March 2023

चंदगड एस. टी. आगार प्रमुख निकम यांची तडकाफडकी बदली

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
      येथील चंदगड एस.टी.आगाराचे वादग्रस्त व्यवस्थापक अमर निकम यांची तडकापडकी बदली करण्यात आली आहे. चंदगड आगाराचा प्रभारी कार्यभार गडहिंग्लजचे आगार व्यवस्थापक शिंदे यांचेकडे सोपविण्यात आला असून शुक्रवारी रात्रीच निकम यांनी गाशा गुंडाळून कोल्हापूर येथे रवाना झाले. 
कर्मचाऱ्यांशी उध्दट वागणे, ग्रामीण भागात वेळेवर गाड्या न सोडणे, जुने रूट बंद करणे, आणि चंदगड डेपोची दूरावस्था करणे त्यांना महागात पडले आहे. या सर्व प्रकारांची नोंद घेत जिल्हा परिवहन नियंत्रक यांनी चंदगड डेपो व्यवस्थापक निकम यांच्यावर कारवाई केली आहे. चंदगड आगाराचा तात्पुरता कार्यभार गडहिंग्लजचे आगार प्रमुख शिदे यांच्या कडे सोपविण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment