हलकर्णी महाविद्यालयात जागतिक महिला दिन, महाविद्यालयात अवतरल्या राष्ट्रमाता जिजाऊ, किरण बेदी अन कल्पना चावला - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2023

हलकर्णी महाविद्यालयात जागतिक महिला दिन, महाविद्यालयात अवतरल्या राष्ट्रमाता जिजाऊ, किरण बेदी अन कल्पना चावला


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
स्त्रीचा सन्मान सर्व काळ व सर्व ठिकाणी केला गेला पाहिजे. त्यामुळे भयमुक्त वातावरण स्त्रीसाठी निर्माण होईल . निकोप समाज निर्मितीचे ते लक्षण आहे असे उद्गार सौ. शितल पाटील यांनी काढले. हलकर्णी महाविद्यालयात अंतर्गत तक्रार समिती व सचेतना मंडळामार्फत आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या या नात्याने त्या बोलत होत्या. 

या प्रसंगी किरण लोंढे, अनुराधा शिरगावकर, जान्हवी नावगेकर, कोमल होनगेकर, ममता राऊत, प्रिया पाटील, सोनाली गडकरी, पल्लवी केरकर, जान्हवी नावगेकर, मनीषा जाधव यांनी डॉ . आनंदी बाई जोशी, किरण बेदी, महाराणी ताराबाई, राष्ट्रमाता जिजाऊ, कल्पना चावला, कमला सोहोनी ही स्त्री व्यक्तिमत्वे उत्कृष्ट रंगभूषा व वेषभूषेसह सादर केली. विद्यार्थिनींनी सर्वक्षेत्रात न घाबरता वावरले पाहिजे, असे उद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. अश्विनी जाधव यांनी काढले. ग्रंथपाल केळकर व्ही. जी. यांनी महिलांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जे. पी. पाटील यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. व्हटकर जे. जे. यांनी करून दिला. सूत्र संचालन माधूरी सुतार व आभार प्रदर्शन गीता पाटील यांनी केले. अंतर्गत तक्रार समितीच्या सदस्या सौ. लता पाटील या प्रसंगी आवर्जून उपस्थित होत्या. महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी कार्यक्रम आयोजनासाठी यांचे मार्गदर्शन लाभले.No comments:

Post a Comment