![]() |
ओलम (हेमरस) कडून यशस्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करताना बिझनेस हेड भरत कुंडल व सुधीर पाटील व शेतकरी |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
ओलम शुगर कडून आजवर ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार आणि कामगार यांच्या हिताचाच विचार होत असल्याकारणाने भागातील शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यात कारखाना अग्रेसर आहे त्यातूनच शेतकऱ्यांचा कारखानावर विश्वास वाढला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी 13 व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
यंदाच्या 13 व्या गळीत हंगामात 6 लाख 64 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून हंगाम यशस्वी केला असून यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
सुरुवातीला मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, कारखान्याने केवळ आपला नफा न बघता शेतकऱ्यांचे,वाहतूकदार व कारखाना कामगार यांच्या हिताचाच सदैव विचार केला असून त्यांचे जीवनमान कसे उंचावेल याकडे विशेष लक्ष दिले आहे.
यावेळी ऊस पीक स्पर्धेत यशस्वी झालेले पाटणे फाटा विभागात लागणमध्ये सुबराव हारकारे, उत्तम मुरकुटे व रविंद्र देशपांडे तर खोडवा मध्ये भरमाना बेळगावकर, गोपाळ बेळगावकर व देवाप्पा पाटील. कोवाड विभागात लागण केलेले - डाॅ. शंकर पाटील, शितल पाटील व अरुण तेऊरवाडकर. खोडवा मध्ये- विजय पाटील, दयानंद जाधव व जोतिबा जाधव. तसेच गडहिंग्लज विभागात लागण- अन्नपूर्णा सोलापूरे, बसाप्पा कुरणे व सुनिलकुमार व्हंजी यांनी तर खोडवा मध्ये -विठ्ठल निंबाळकर, विजय अरभावी व धैर्यशील जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक मिळविले बद्दल बिझनेस हेड भरत कुंडल व मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शशांक शेखर, संध्या मॅडम, कामगार संघटना अध्यक्ष संतराम गुरव यांची भाषणे झाली. अनिल पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर नामदेव पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment