महादेवराव बी. एड. कॉलेजमध्ये महिला दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2023

महादेवराव बी. एड. कॉलेजमध्ये महिला दिन उत्साहात


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेव बी.एड. कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य  एन. जे. कांबळे हे होते. प्रास्ताविक मैथिली पाटील यांनी केले. यावेळी डॉ. निकिता कणबरकर यांनी 'जिद्द आणि आंतरिक शक्तीच्या द्वारे विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटावा' असे आवाहन केले व सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या. तर आधुनिक युगात महिलांना कर्तुत्ववान बनविण्यासाठी सदृढ आरोग्य, शौर्य, मूल्य संस्कार आणि उद्योगशीलता निर्माण करण्यावर सर्वांनी भर देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ग. गो. प्रधान यांनी केले.प्राचार्य काबंळे यानी २१ व्या शतकामध्ये विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या द्वारे आत्मनिर्भरता निर्माण करावी अशी अपेक्षा अध्यक्ष व्यक्त केली.

 यावेळी प्रशिक्षणार्थीने बनवलेल्या भितीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते केले तसेच विद्यार्थिनींनी पाककला व वेशभूषा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रशिक्षणार्थी सुनील कांबळे, सविता चौगुले, वैशाली लोहार, प्रशांत नाईक, तेजस्विनी कांबळे, अमोल तेरणीकर यांनी मनोगत व्यक्त केली. 
 या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष महादेव वांद्रे, अधीक्षिका श्रीमती सपना देशपांडे, प्राचार्य एस. पी. गावडे, प्रा. सौ. पूजा घुघरे, प्रा. सौ. पी. पी. कदम, प्रा. सौ. भक्ती बसापुरे, प्रा. पूजा कांबळे, सांस्कृतिक प्रतिनिधी पूजा सुतार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी मिरा चौगुले व स्नेहल सावंत यांनी केले, तर आभार उज्वला कांबळे यांनी मानले.



No comments:

Post a Comment