नेसरीची सुवर्णकन्या कु. सृष्टी रेडेकरचा विद्याधर गुरबे यांनी केला सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2023

नेसरीची सुवर्णकन्या कु. सृष्टी रेडेकरचा विद्याधर गुरबे यांनी केला सन्मान


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
        नेसरी  (ता. गडहिंग्लज) येथील कु. सृष्टी श्रीधर रेडकर हिने काठमांडू  नेपाळ येथे अशियाई  क्रॉस कंट्री स्पर्धेत 20 वर्षा खालील ६ कि. मी. धावणे या स्पर्धेत सुवर्णपदक पटकवले. 
       नेसरी सारख्या गावातील सृष्टी ने सुवर्ण पदका गवसणी घातल्याबद्दल सृष्टी व तीच्या आई वडीलांचे अभिनंदन गडहिंग्लज पंचायत सिमितीचे उपसभापती विद्याधर गुरबे यानी केले. यावेळी  सृष्टीचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सृष्टी च्या या सुवर्ण यशाने केवळ नेसरीचे नाव मोठे झाले नसून संपूर्ण महाराष्ट्र या यशाने आनंदित झाला असल्याचे मनोगत विद्याधर गुरबे यानी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी रामचंद्र परीट, सागर नांदवडेकर, गुरूनाथ चव्हाण, विनायक नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment