|  | 
| चंदगड ऑफिसर्स संघाविरुद्धच्या प्रदर्शनीय सामन्यापूर्वी न्यायाधीश ए सी बिराजदार, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्यासोबत चंदगड पत्रकार संघाचे सदस्य खेळाडू | 
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
         आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव- वेंगुर्ला महामार्गावरील हिंडाल्को क्रीडांगणावर (हिंडगाव, चंदगड) खेळवण्यात आलेल्या प्रदर्शनीय क्रिकेट सामन्यात चंदगड ऑफिसर्स संघाने पत्रकार संघाचा निसटता पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पत्रकार संघाने ६ षटकात ५ गडी बाद ४५ धावा केल्या होत्या.  उत्तरा दाखल खेळताना अधिकारी संघाने दोन चेंडू शिल्लक असताना ३ गड्यांच्या मोबदल्यात उद्दिष्ट पार केले. 
  पत्रकार संघाकडून अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी किफायती गोलंदाजीचे प्रदर्शन करत दोन गडी बाद केले. तर अधिकारी संघाकडून खेळताना संघाचे कर्णधार पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी फलंदाजीत चमक दाखवली. पत्रकार संघाकडून उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सी. एल. न्यूजचे संपादक संपत पाटील, संस्थापक अनिल धुपदाळे, कर्णधार निंगाप्पा बोकडे, सत्यघटनाचे संपादक राहुल पाटील, चेतन शेरेगार, संतोष सुतार, चंदगड टाइम्सचे संपादक संतोष सावंत- भोसले, तातोबा गावडा, बी न्यूजचे राजेंद्र शिवणगेकर, सदस्य सागर चौगुले, संजय पाटील यांनी सहभाग घेतला. तर अधिकारी संघाकडून खेळताना चंदगडचे दिवाणी न्यायाधीश ए. सी. बिराजदार, रेंजर नंदकुमार भोसले, वनपाल सागर पवार, सहन्यायाधीश चारुदत्त शिपकुले, नायब तहसीलदार हेमंत कामत, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी चंद्रशेखर आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन सामन्यात रंगत आणली.
   चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित 'पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३' स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या या प्रदर्शनीय सामन्याचा क्रिकेट शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद लुटला. यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके, नगरसेवक अभिजीत गुरबे, बाळासाहेब हळदणकर, दक्ष कलेक्शन कोवाडचे मालक परशराम गायकवाड, शिक्षक नेते शंकर मनवाडकर, विलास पाटील, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे, पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी विलास कागणकर आदी पत्रकारांची उपस्थिती होती.
 

 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment