चंदगड तालूका माध्यमिक शिक्षक संघटनेकडून बीएलओ आदेश रद्द करण्यासंदर्भात गट शिक्षणाधिकारी सौ सुभेदार याना निवेदन देताना. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
माध्यमिक शिक्षकांना मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) चे आदेश शासनाकडून देण्यात आल्याने ते रद्द करण्या संदर्भातील निवेदन चंदगड च्या गट शिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांना चंदगड तालूका माध्यमिक शिक्षक संघटना व माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांचेकडून आज देण्यात आले.
सध्या सुरु असणार्या १० वी १२ वी परिक्षेच्या धामधूमीत माध्यमिक शिक्षकांना मतदान केद्र स्तरीय अधिकारी ( बीएलओ) चे आदेश शासन कडून काढण्यात आल्याने माध्यमिक शिक्षकाकडून संतापाची लाट उसळली आहे.
माध्यमिक विभागाकडील शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामांना सामोरे जावे लागत आहे. प्राथमिक विभागाकडील सांस्कृतिक स्पर्धाना परीक्षक, क्रीडा स्पर्धाना पंच अशी कामे करावी लागत आहेत. अशातच इ.५वी शिष्यवृत्ती व इ.८वी शिष्यवृत्ती, एन एन एम एस परीक्षांचे पर्यवेक्षक व ज्यादा तास, १० वी १२ वी बोर्ड परिक्षा व पेपर तपासणी, विज्ञान प्रदर्शन, शालेय क्रीडा स्पर्धा याच बरोबर दररोजचे वर्गातील शालेय अध्यापन करावे लागते. परीक्षेनंतर पेपर तपासणीचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. काही ज्येष्ठ शिक्षकांना मॉडरेटर म्हणून ऑर्डर आल्या आहेत . एका बाजूने समाजात शिक्षकांकडून चांगल्या निकालाची अपेक्षा ठेवली जात आहे. या अशैक्षणिक कामांमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. या सगळ्या कामामधून B.L.O कामकाजासाठी वेळ मिळणे अशक्य आहे. यातच काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या काही शिक्षकांनाही असे आदेश काढण्यात आले आहेत . त्यामूळे याचा विचार करून माध्यमिक शिक्षकांची BLO ची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे . यावेळी एम व्ही कानुरक व सुभाष बेळगावकर यानी आपले मनोगत व्यक्त केले . यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO)चे आदेश रद्द करण्यासंदर्भात संबधीत निवेदन आज चंदगड च्या गटशिक्षणाधिकारी सौ .सुभेदार यांचेकडे
चंदगड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघ चंदगड व चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक संघ याच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष बेळगावकर , एम . बी पाटील , व्ही .के मोहिते, एस. डी .पाटील, व्ही .एन . सुर्यवंशी, गुलाब पाटील , दादा भोगूलकर , एम . व्ही . कानूरकर, यांच्या सह माध्यमिक शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment