चंदगड येथे ज्ञानदीप वाचनालयात महिल दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2023

चंदगड येथे ज्ञानदीप वाचनालयात महिल दिन उत्साहात

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय व स्वावलंबी दिव्यांग विधवा शेतकरी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने (८मार्च) जागतीक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ प्राची काणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविक ग्रंथपाल सौ रिबेका कुतिनो यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. या महिला दिनाचे औचित्य साधून प्रतिकूल परिस्थितीत एल. एल. बी. पदवी मिळविलेल्या सौ. अमृता शेरेगार व चंदगड नगरीच्य प्रथम नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांचा वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


  यावेळी नगराध्यक्षा सौ. काणेकर म्हणाल्या राजकारण कांही माझ क्षेत्र नव्हत नगरपंचायत नविन, तेथील अधिकारी नवीन आणी मी ही नविन यामुळे मलाच प्रत्येक गोष्टिचा अभ्यास करावा लागला चंदगड मधील बरीचशी विकास कामे केली आहेत अजुन उर्वरित  कामे करायचीही आहेत. माझ्या कारकिर्दित ती पूर्ण करणार असल्याचे सांगून, माझा सत्कार उच्च अधिकारी घडविलेल्या वाचनालयात होतो. याचा मला अभिमान वाटत असल्याचे सांगितले. तर अँड. अमृता शेरेगार यांनी  पतीच्या आग्रहास्तव एम. ए. बी. एड केले व त्यानंतर एल. एल. बी. ची पदवी संपादन केली. समाजात बोलले जाते की, पुरुषाच्या प्रत्येक यशामागे स्त्री असते मात्र, माझ्या मागे माझे पतीचेे मार्गदर्शन मोलाचे ठरले. मी स्वता दिव्यांग आहे, मी आमच्या स्वावलंबी दिव्यांग विधवा संस्थेची पदाधिकारी आहे संस्थेच्या विविध कामात मी सक्रिय असते. दिन-दुबळ्यांची सेवा करण्याची संधी या संस्थेमुळे मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी अर्पिता नार्वेकर, गीता माने, सुप्रिया शिरोडकर, सरपंच सुनीता कांबळे, नेत्रा कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केली.
 कार्यक्रमाला चंदगड अर्बनच्या संचालिका अर्चना संजय ढेरे, वाचनालयाचे अध्यक्ष अशिष कुतिनो, मारूती पाटील, नंदू कांबळे, अशोक पाटणे, विष्णु कुंभार, अहमद शेख, नंदू वर्पे, व्यंकटेश शेरेगार, अजय फाटक उपस्थित होते. आभार गिता माने यांनी मानले.



No comments:

Post a Comment