तुर्केवाडी येथे माती परीक्षण जनजागृती उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2023

तुर्केवाडी येथे माती परीक्षण जनजागृती उत्साहात


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड)  यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत बळीराजाहिता कार्यक्रमांतर्गत तुर्केवाडी येथे माती परीक्षण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी गावातून रॅली माती परीक्षण जनजागृती फेरी काढली यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व सांगण्याच्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर माती परीक्षण जनजागृती बद्दल सर्वेक्षण विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले व माती परीक्षण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ए. स. बागवान यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद करत असताना माती परीक्षण किती महत्वाचा आहे. तसेच प्रयोगशाळा संदर्भामध्ये माहिती दिली. यावेळी सरपंच रुद्राप्पा तेली उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक साबळे यानी जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होऊ शकतो. स्वागत डॉ. सुरज सुतार यांनी केले. यावेळी प्रा. ए. एस. जाधव, प्रा. सौ. सुप्रिया यादव, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.  सूकन्या सावंत व प्रा. मनोज जंबोटकर यांनी केले तर प्रा. ए. एस. जाधव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment