चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
खामदळे (ता. चंदगड) येथील गावा शेजारील गट. नं. २३६ मध्ये अज्ञाताने लावलेल्या आगीत १६ एक्करातील काजू बाग व आंब्याची कलमे जळून २५ लाखांचे नुकसान झाले आहे.
भर दुपारी उन्हाच्या तडाख्यात लागलेल्या आगीने वाऱ्यामुळे रौद्र रूप धारण केले. शेतकऱ्यांकडून आग विझवण्याच प्रयत्न करण्यात आला पण वाऱ्यामुळे आग नियंत्रणात आली नाही. या आगीत विनायक नारायण पाटील, सौ. शारदा नारायण पाटील, राजाराम हणमंत पाटील व श्रीमती यशोदा भगवंत पाटील या सर्व शेतकऱ्यांची १६ एक्कर क्षेत्रातील काजू बाग जळून बेचीराख झाली. यामध्ये त्यांनी नवीन कलमी रोपांचीही लागवड केलेली होती. ती कलमेही जळून खाक झाली.
विनायक पाटील आणि शारदा पाटील यांची पूर्णता बाग जळून अंदाजे १२ ते १५ लाखाचे व राजाराम पाटील आणि यशोदा पाटील यांचे अंदाजे ११ ते १२ लाखांचे नूकसान झाले आहे. या जळीतग्रस्त बागेची पहाणी तलाठी ओमकार नाईक, कृषी सहाय्यक गणेश गायकवाड, ग्रामसेवक मडव, सरपंच धुळू फोंडे, पो.पा.मारुती गावडे, कोतवाल गोविंद पाटील, ग्रा.पं सदस्य प्रकाश नरगूंदकर, तूकाराम धुरी, शामराव गावडे, राजाराम मोरे,रवळनाथ पाटील, नारायण पाटील, शैलेष पाटील यांनी केली आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment