जांबरे येथे माडखोलकर महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2023

जांबरे येथे माडखोलकर महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन युवकांवर उत्तम संस्कार करणारी योजना आहे. यातून युवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व जडणघडण होण्यास मदत होते. युवकांना पर्यावरणाचे संरक्षण, प्राणीमित्र बनने, झाडे लावा - झाडे जगवा, शेतीला प्राधान्य, विनम्रता, बंधुभाव, गुरु- शिष्य महिमा, स्वावलंबन, देशाभिमान, स्वच्छता यासारख्या असंख्य गोष्टी शिकविण्याचे उत्तम कार्य या श्रमसंस्कार शिबिरातून होत असते असे प्रतिपादन एस. आर. देशमुख यांनी केले. ते माडखोलकर महाविद्यालयाच्या मु. जांबरे येथे सुरू असलेल्या विशेष संस्कार शिबिराच्या समारोप  प्रसंगी बोलत होते. डाॅ. एन. के. पाटील यांनी आभार मानले. 

         मंगळवार दि. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीत संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटक तहसीलदार विनोद रणवरे व मार्गदर्शक    पोलिस निरिक्षक संतोष घोळवे होते. दि.1 मार्च रोजी डाॅ.विश्वनाथ पाटील यांचे प्रबोधनात्मक प्रवचन झाले. हत्तीमित्र आनंद शिंदे यांनी एक संवाद हत्तींशी या विषयावर मार्गदर्शन केले. आधुनिक शेती तंत्र व पाणलोट विकास या विषयावर कृषितज्ञ सुरेश माने पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दि. 2 मार्च रोजी महिला सबलीकरण व आरोग्य या विषयावर सौ. राजश्री गावडे व प्रा. सौ. सरोजिनी दिवेकर यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. 

           दि. 3 मार्च रोजी अॅड.आर. पी. बांदिवडेकर यांनी हुंडाबंदी कायदा व इतर कायदेविषयक मार्गदर्शन केले. दि. 4 मार्च रोजी पशु चिकित्सा शिबिर घेतले. गोकुळ दूध संघाचे सहाय्यक व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे व डाॅ. अनिल परगणे यांनी पशुधन कळजी व दुग्ध व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन केले. दि.5 मार्च रोजी जादूगर एम. कुमार यांचे जादूचे प्रयोग झाले. रात्री स्वयंसेवकांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केला. 

         उद्घाटक प्राचार्य डाॅ. पी. आर. पाटील होते. दि. 6 मार्च रोजी कोल्हापूर जिल्हा समन्वय प्रा. संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचा सांगता समारंभ पार पडला. एस. आर. देशमुख यांनी स्वयंसेवक व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास या घोषवाक्याने प्रेरित होऊन स्वयंसेवकांनी या शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता, पाणी व्यवस्थापन, जलसाक्षरता, अंधःश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, प्रदूषण मुक्ती, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, योग आणि प्राणायाम, अवयवदान, श्रम प्रतिष्ठा, इ. विविध उपक्रम पार पाडत या शिबिराची उत्साहात सांगता झाली.

No comments:

Post a Comment