कालकुंद्री येथील 'अखंड नाम सप्ताह' समाप्ती, १४ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2023

कालकुंद्री येथील 'अखंड नाम सप्ताह' समाप्ती, १४ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

 

श्री कलमेश्वर, ग्रामदैवत कालकुंद्री

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वरच्या अखंड नाम सप्ताहाची नुकतीच सांगता झाली. समाप्ती रोजी सुमारे १४ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

      महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या 'अखंड नाम सप्ताह' चे यंदा सलग ९४ वे वर्ष होते. दरवर्षी फाल्गुन शुद्ध पंचमीचा सूर्योदय ते फाल्गुन शुद्ध द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत सलग सात दिवस मंदिरात "सांब सदाशिव सांब हर हर सांब सदाशिव सांब" नामस्मरणाचा अखंड गजर चालतो. सप्ताह काळात रोज हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन, नवसाच्या मुलांची 'तुलादान'  (वजन करणे) असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. समाप्ती रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत महाप्रसादाचे वाटप व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सोंगी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती तर महाप्रसादाचा सुमारे १४ हजार भाविकांनी लाभ घेतला.

No comments:

Post a Comment