चंदगड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी दयानंद काणेकर, उपाध्यक्षपदी बाबुराव हळदणकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2023

चंदगड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी दयानंद काणेकर, उपाध्यक्षपदी बाबुराव हळदणकर यांची निवड

                      


दयानंद काणेकर

                                                                  बाबुराव हळदणकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड येथील अर्बन को ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी दयानंद काणेकर व उपाध्यक्षपदी बाबुराव हळदणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रेमचंद राठोड यांनी काम पाहिले. 

       अध्यक्षपदासाठी श्री. काणेकर यांचे नाव अरुण पिळणकर यांनी सुचविले, त्याला अरुण गवळी यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी बाबुराव हळदणकर यांचे नाव राजेंद्र परीट यांनी सुचविले, त्याला सुनिल काणेकर यांनी अनुमोदन दिले. 

      यावेळी प्रमोद कांबळे, फिरोज मुल्ला, संतोष वणकुंद्रे, सौ. अर्चना ढेरे, सौ. माधवी मुळीक यांच्यासह सचिन बल्लाळ व सुरेश सातवणेकर या संचालकांसह सहाय्यक निबंधक अनुराधा काटकर उपस्थित होत्या. आभार व्यवस्थापक नौशाद मुल्ला यांनी मानले.


No comments:

Post a Comment