आग विझताना चिमणे येथील वृद्धाचा दुर्दैवी मृत्पू ! चिमणे गावावर शोककळा - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2023

आग विझताना चिमणे येथील वृद्धाचा दुर्दैवी मृत्पू ! चिमणे गावावर शोककळा

विठोबा भिमराव नादवडेकर

आजरा / सी. एल. वृतसेवा 

         चिमणे (ता. आजरा) येथील ह. भ. प. विठोबा भिमराव नादवडेकर (वय - ८३)  हे शेतात पाला पेटवण्यासाठी गेले असता आगीत  जागीच होरपळून मृत्यू झाला. आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

संग्रहित छायाचित्र

    विठोबा नादवडेकर सकाळी दहा वाजता चिमणे - बेलवाडी नजाक बामणकी नावाच्या शेतात पाला - पाचोळा गोळा करण्यासाठी गेले होते. पाला पाजोळा गोळा करून झाल्यानंतर त्यांनी कचरा पेटवण्यास सुरुवात केली. बाराच्या सुमारास कडक ऊन व वारा यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. नादवडेकर यांनी शेजारी असणाऱ्या घराला आग लागेल म्हणून ते आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. सगळीकडे पसरु लागली  होती. 

         या दरम्यान त्यांच्या कपड्यांना आग लागल्याने त्यांचा जागीच होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. दुपारी एकच्या सुमारास रस्त्यावरून जा - ये करणाऱ्या शेतकऱ्यांना आग पेटत असल्याचे दिसले असता बाजूला धोंडीबा नादवडेकर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. रात्री उशिरा शेतात अत्यंसंस्कार करण्यात आले. 

No comments:

Post a Comment