चंदगड महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबीराला जांबरे येथे प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2023

चंदगड महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबीराला जांबरे येथे प्रारंभ

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      शिवाजी विद्यापीठ अंतर्गत चंदगड येथील र भा माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर जांबरे (ता. चंदगड) येथे २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटन जांबरे गावचे सरपंच विष्णू गावडे यांनी केले.

     `युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास` या घोषवाक्याने सुरू झालेल्या शिबिराचे प्रमुख अतिथी तहसीलदार विनोद रणवरे व पोलीस निरीक्षक संतोष घोळवे होते. 

यावेळी तहसिलदार विनोद रवणरे म्हणाले, ``आजच्या युगातील युवक श्रमापासून दुर जात आहे. सद्याची जीवनशैली भौतिक सोई-सुविधामुळे आरामदायी बनत चालली आहे. त्यामुळे माणूस श्रम विसरत चालला आहे. मात्र श्रमशिवाय पर्याय नाही. श्रमसंस्कार शिबीर या उपक्रमात महाविद्यालयाच्या माध्यमातून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले आहे. हि कौतुकाची बाब आहे. जीवनात यश मिळवायचे असेल तर कष्टातून वाटचाल करावी लागते. त्याला श्रमाची जोड मिळाल्यास ध्येय निश्चितच साध्य करता येते. असे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिबीरात मिळालेला हा श्रमाचा संस्कार त्यांना भावी आयुष्यातही उपयोगी पडेल.``

पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रकल्प अधिकारी व कोल्हापुर जिल्हा समन्वयक प्रा. संजय पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन संचालन ए. डी. कांबळे यांनी केले व आभार प्रा. व्हि. के. गावडे यांनी मानले.No comments:

Post a Comment