![]() |
दहावी बोर्ड परीक्षेला अडकूर केंद्रावर आलेले विद्यार्थी केंद्रसंचालकांच्या सूचना ऐकताना |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १० वी बोर्ड परिक्षेला आज मराठी च्या पेपरने सुरवात झाली . प्रत्येक परिक्षा केंद्रावर ७ ते ८ जणांचे बैठे पथक नेमण्यात आले आहे तर केंद्रावरील संपूर्ण पर्यवेक्षक विद्यार्थ्यांसाठी अपरिचित असल्याने याचा धसका विद्यार्थ्यांनी घेतला . कोणता ही अनुचित प्रकार न घडता चंदगड तालूक्यात मराठीचा पेपर सुरळीत पार पडला .
या परिक्षेसाठी कोल्हापूर , सांगली व सातारा जिल्ह्यातून १ लाख ३० हजार ७४७ विद्यार्थी प्रविष्ठ आहेत . कोरोणा मुळे आठवी व नववी परिक्षा न देवू शकलेले विद्यार्थी आता प्रथमच बोर्ड परिक्षा देत असल्याने तणावाखाली होते . त्यातच बोर्डने प्रत्येक केंद्रावर बैठे पथक तर नेमलेच आहे पण त्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात ५ भरारी पथके नेमली आहेत . तसेच प्रत्येक केंद्रावर स्थानिक शाळेतील पर्यवेक्षकांची नेमणूक न करता पर्यवेक्षकांना केद्रबदल करून देण्यात आले आहे . परिक्षा केंद्रावर संपूर्ण यंत्रणाच नविन असल्याने विद्यार्थी गोंधळलेल्या स्थितित होते . सहाय्यक परिरक्षकाकडे जिपिएस ट्रॅकिग कैमेरा वापरण्यास अनुमती दिली आहे . त्यामुळे प्रश्नपत्रिका सुरक्षित पणे केंद्रावर पोहचण्यास मदत होत आहे . एकंदरीत आज झालेला मराठी चा पहिला पेपर विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त नव्हे तर तणावाखाली दिला .
कु प्रणाली नाईक
कोरोणानंतर पहिलीच बोर्ड परिक्षा देताना मनावर प्रचंड दडपण तर होतेच पण परिक्षा केंद्रावरील बैठे पथक , अनोळखी पर्यवेक्षक बघून मनामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला . आठवी ,नववी मध्ये कोरोणा मुळे अभ्यास व लिखाणाची गती संथ झाली होती . त्यामुळे मराठीचा पेपर लिहीताना तारांबळ उडाली.
No comments:
Post a Comment