सुडाग्नी' कादंबरीस साहित्य परिषदेचा पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2023

सुडाग्नी' कादंबरीस साहित्य परिषदेचा पुरस्कार



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   साहित्यिक कल्लाप्पा जोतिबा पाटील (के जे पाटील) यांच्या सुडाग्नी या कादंबरीला करवीर साहित्य परिषद कोल्हापूर यांचा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. के जे पाटील कालकुंद्री (ता. चंदगड) गावचे असून ते प्राथमिक शिक्षक आहेत. सुडाग्नी ही त्यांनी लिहिलेली पहिलीच कादंबरी पुरस्कार प्राप्त ठरली आहे. नाईट कॉलेज कोल्हापूर येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ अरुण शिंदे यांच्या हस्ते नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील, करवीर साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य राजू भगत, एम. बी. शेख, प्राचार्य दिनकर पाटील, रवींद्र ठाकूर, संजीवनी तोफखाने, वाचन कट्टा कोल्हापूरचे युवराज पाटील, ज्येष्ठ साहित्यिक श्याम कुरळे, कालकुंद्री येथील हरिश्चंद्र पांडुरंग पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
   के. जे. पाटील यांचे यापूर्वी तलप, झुंज आदी चार  कथासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. चंदगड तालुक्यातील उदयोन्मुख साहित्यिकाच्या पहिल्याच कादंबरीला बहुमान प्राप्त झाल्याबद्दल साहित्यिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.



No comments:

Post a Comment