संजय राऊत यांनी दिली डॉ. चेतन नरके यांच्या घरी सदिच्छा भेट, संजय राऊत व डॉ. चेतन नरके यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2023

संजय राऊत यांनी दिली डॉ. चेतन नरके यांच्या घरी सदिच्छा भेट, संजय राऊत व डॉ. चेतन नरके यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण


कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा
राज्यातील फायर ब्रॅण्ड नेते संजय राऊत हे कोल्हापूर जिह्याच्या दौऱ्यावर आहेत. विविध राजकीय सभा आणि कार्यक्रमांसोबत ते काही प्रमुख लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान आज सकाळी संजय राऊत यांनी चेतन नरके यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. आताच्या बदलत्या आणि संवेदनशील राजकीय पार्श्वभूमीवर हि भेट महत्वाची मानली जाते.


डॉ. चेतन नरके हे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासाठी ते महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सातत्याने भेटी घेत आहेत. गेल्या महिन्यात कोल्हापूर येथे डेअरी परिषद आणि डेअरी प्रदर्शनाचे आयोजन करून राज्यातील नेत्यांना त्यांनी आमंत्रण दिले होते. महाविकास आघाडीसह इतर पक्षातील  बऱ्याच नेत्यांनी त्याला हजेरी लावली होती.  शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी चेतन नरके यांचे बंधू माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आपण शिंदे गटात असल्याचे सांगितले आणि त्यानंतर मतदारसंघातील आजवर चंद्रदीप नरके यांना  पाठींबा दिलेल्या शिवसैनिकांचा राग उफाळून आला. अशावेळी संजय राउत यांची हि भेट चंद्रदीप नरके यांच्या जागी पर्यायाची चाचपणी असाही होऊ शकतो.
आज डॉ. चेतन नरके यांच्या कन्येचा नामकरण सोहळा होता. त्यामुळे हि वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट होती असे चेतन नरके म्हणत असले तरी या  भेटीला अनेक अर्थ लावले जात आहेत.


No comments:

Post a Comment