तेऊरवाडी - पुस्तकांच्या उभारलेल्या गुढीतील पुस्तके पाहताना एम. ए. पाटील |
कोवाड /सी. एल. वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता .चंदगड ) येथील अध्यापक एस. के . पाटील व डॉ . सौ . एल .एस .पाटील यांनी घरासमोर पुस्तकांची गुढी उभारून एका आगळ्यावेगळ्या प्रकारे गुढीपाडवा सण साजरा केला आहे .
फेसबुक ,व्हाट्स अॅप च्या या ऑनलाईन जमान्यात पुस्तकापासून युवक दूर जात आहे . वाचनाची गोडी कमी होत आहे . अशा या युवकांनी पुन्हा परत पुस्तकाबरोबर मैत्री करावी यासाठीच या पुस्तकांची गुढी उभा केली असल्याची माहीती अध्यापक एस. के . पाटील यांनी दिली. पुस्तकं वाचनाची आवड असणाऱ्या युवकांना विनामुल्य पुस्तक वाचण्याची संधी श्री पाटील यानी करून दिली आहे . भविष्यात पुस्तकांशी मैत्री केलेला विद्यार्थी जीवनात यशाची शिखरे गाठू शकेल असे विचार डाँ . सौ पाटील यानी व्यक्त केले . या आगळ्या वेगळ्या गुढी पाहण्याचा लाभ अनेकांनी घेलता.
No comments:
Post a Comment