हुंदळेवाडी येथे उभारली पुस्तकरूपी विचाराची गुढी गुढी पुस्तकांची ....गुढी विचारांची ... - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2023

हुंदळेवाडी येथे उभारली पुस्तकरूपी विचाराची गुढी गुढी पुस्तकांची ....गुढी विचारांची ...

 


चंदगड / प्रतिनिधि
हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथील प्रा. रवी पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे घरासमोर पुस्तकांची गुढी उभारून एका आगळ्यावेगळ्या प्रकारे गुढीपाडवा सण साजरा केला आहे.
 व्हाट्सअप च्या जमान्यात पुस्तकापासून दूर गेलेला युवक पुन्हा परत पुस्तकाबरोबर जोडला जावा यासाठीचा हा प्रयत्न केल्याचे प्रा.पाटील यांनी सांगितले. भविष्यात पुस्तकांशी मैत्री केलेला विद्यार्थी सर्व काही मिळवू शकेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. वाचाल तर वाचाल... वाचन म्हणजे प्रगतीचे लक्षण... व्हाट्सअप वापर कमी करा पुस्तकांशी मैत्री करा.... संवाद वाढवा एकटेपणा घालवा ...वाचन करा हाच खरा ज्ञानाचा झरा..... ग्रंथ हे आपले गुरु वाचनासाठी हाती धरू..... काय गोष्टी ..काय कथा काय कादंबऱ्या... समद वोके मधे हाय....  अशा विविध भितीपत्रकांनी ही गुढी सजवण्यात आलेली आहे.
ही गुढी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.


No comments:

Post a Comment