शेतीसाठी पाण्याचे नियोजन करण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्च्या काढण्याचा पाटबंधारेला इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2023

शेतीसाठी पाण्याचे नियोजन करण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्च्या काढण्याचा पाटबंधारेला इशारा

चंदगड तालुक्यातील कोरडी पडलेली नदीपात्रे

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
 चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी प्रकल्पामध्ये असणाऱ्या पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून व्यवस्थितरित्या होत नसलेकारणाने शेतकऱ्यांची ऊस पिके वाळून जात असून लवकरात लवकर पाण्याचे नियोजन करण्याबाबत चे  निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा दीपक पाटील यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, कारखान्याकडून ऊस गेल्यानंतर सर्व शेतकरी ऊस लागण आणि खोडव्याना पाणी देण्यासाठी शिवारामध्ये आहेत आपल्याला माहिती आसेलच तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री लाईट असते . उष्णता वाढली आहे त्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे .धरणामध्ये पाणी आहे पण नदीमध्ये नाही . अनेकांच्या मोटर पंपा पाणी मिळत नाही . अनेक ठिकाणी नदी पात्र उघडे पडले आहे.
हांज वहळ  पात्रा वरील कारवे ते ढोलगरवाडी व ताम्रपर्णी  नदी पात्रा वरील माणगाव पासून राजगोळी पर्यंत  अनेक कृषी पंप धारकाना याचा फटका बसत आहे.
शेतकरी काही ही सहन करेल पण शेतातील वाळलेले पीक पाहू शकत नाही त्यामुळे तात्काळ आपण हांज वहळ ला पाणी सोडावे आणि प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन  करावे .अन्यथा आपल्या यशवंत नगर कार्यालयावर  शनिवार दि २५ मार्च रोजी दुपारी २ वाजता मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे.


No comments:

Post a Comment