छत्रपती शाहूंचे विचारच शैक्षणिक क्रांती घडवतील - संजय साबळे - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2023

छत्रपती शाहूंचे विचारच शैक्षणिक क्रांती घडवतील - संजय साबळे

 

दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भू. पाटील ज्युनि. कॉलेजमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        "शाहू महाराजानी बहूजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा केली. जे पालक आपल्या मुलांना शाळेला पाठवत नाहीत त्यांना प्रतिमहिना एक रुपये दंड आकारण्याची कायदेशीर तरतुद केली. अशी तळमळ आजच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांकडून झाली तरच शैक्षणिक क्रांती घडेल" असे प्रतिपादन  उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी केले. ते दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भू. पाटील ज्युनि. कॉलेज चंदगड येथे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त बोलत होते.                              

       छत्रपती शाहूंच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एन.डी. देवळे यांनी केले. यावेळी त्यांनी शाहूंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. संजय साबळे, प्रा. एस. एम. निळकंठ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्याची भाषणे झाली. कार्यक्रमाला ज्येष्ठ अध्यापक टी. एस. चांदेकर, व्ही. टी. पाटील, जे. जी. पाटील, टी. व्ही. खंदाळे,  बी. आर. चिगरे, प्रा. ए. आर. धायगुडे, प्रा.  एस. पी. शेख, प्रा. दुष्यंत शिंदे, प्रा. अशोक नाडगौडा, ए. जे. पाटील, डी. जी. पाटील, व्ही. एम. बुरूड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. टी. बेरडे यांनी केले. ग्रंथपाल शरद हदगल यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment