डुक्करवाडी विद्यालय व जुनि. कॉलेजमध्ये शाहू जयंती उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2023

डुक्करवाडी विद्यालय व जुनि. कॉलेजमध्ये शाहू जयंती उत्साहात साजरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी विद्यालय व ज्युनि. कॉलेज येथे लोकराज्य छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली. 

      प्राचार्य एस. एस. तुर्केवाडकर यांनी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून लोकराज्य शाहूंच्या कार्याची माहिती दिली. एम. एन. शिवणगेकर यांनी छ. शाहूंच्या जीवन चरित्राचा लेखाजोगा विद्यार्थ्यांसमोर मांडून शाहूंनी घेतलेल्या विचाराने आपला कोल्हापूर जिल्हा कसा समृद्ध झाला व विद्यार्थ्यांच्या मोफत शालेय शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात म्हणून केलेले कार्य याबाबत विस्तृत माहिती दिली. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. जी. शिवणगेकर यांनी केले तर आभार वंदना बोकडे यांनी मानले. यावेळी शिक्षक वृद्ध व शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment