पोवाचीवाडी पोलीस पाटलाचा खून घटनेचा निषेध, कठोर कारवाईची मागणी, पाळला निषेध दिवस - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2023

पोवाचीवाडी पोलीस पाटलाचा खून घटनेचा निषेध, कठोर कारवाईची मागणी, पाळला निषेध दिवस

 

पोवाचीवाडी येथील पोलीस पाटील संदीप ज्ञानदेव पाटील यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन करावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार चंदगड यांना देताना तलाठी व मंडळाधिकारी संघटना तसेच चंदगड तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी.

चंदगड : सी एल वृत्तसेवा

    पोलीस ठाण्यातील तक्रारीत नाव गोवल्याच्या संशयावरून पोवाचीवाडी (ता. चंदगड) येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील संदीप ज्ञानदेव पाटील (वय ४१) यांची २४ जून २०२३ रोजी निर्घृण हत्या झाली होती. यातील गुन्हेगारांना कठोर शासन करावे या मागणीसाठी तलाठी व मंडल अधिकारी संघटना चंदगड तसेच चंदगड तालुका महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने आज निषेध दिवस पाळण्यात आला. चंदगड तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळ्याफिती लावून कामकाज केले.

      पोलीस पाटील हे पद महसूल व पोलीस विभागाशी संबंधित एक अविभाज्य भाग आहे. अशा कर्तव्यदक्ष पोलीस पाटील संदीप पाटील यांनी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावले होते. तथापि गावातील समाजकंटकांच्या ते पचनी पडले नाही. व पाळत ठेवून संगनमताने त्यांनी संदीप यांचा खून केला. अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या  समाजकंटकांचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व संदीप यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन संघटनांच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment