वडगाव- बेळगाव येथील अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून साकारलेली "जीव झाला कासावीस, रूप दाव विठ्ठला" ही रांगोळी. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
आषाढी एकादशी निमित्त वारकरी विठू नामाच्या गजरात तल्लीन झालेले असताना एका रांगोळी कलाकाराने भक्तांना रांगोळीतून आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उद्या दि. गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोवा राज्यांसह देशभरातील लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठू नामाच्या गजरात तल्लीन झालेल्या लाखो वारकऱ्यांना आषाढी एकादशीचे औचित्य साधून वडगाव- बेळगाव येथील रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी "जीव झाला कासावीस, रूप दाव विठ्ठला।। या शीर्षकाखाली रांगोळी काढून शुभेच्छा दिल्या आहेत. २ फूट बाय ३ फूट आकाराची लेक कलर मधील रांगोळी रेखाटण्यासाठी त्यांना १२ तास लागले. ही कलाकृती ज्योती फोटो स्टुडिओ नाझर कॅम्प, येळ्ळूर रोड, माधवपूर, वडगाव- बेळगाव येथे दिनांक ४ जुलै २०२३ पर्यंत रोज सकाळी ९ ते सायंकाळी ८ पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे.
अजित औरवाडकर यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, राजर्षी शाहू महाराज, बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न लता मंगेशकर, भीमसेन जोशी, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सनई वादक बिस्मिल्ला खान, सिंधुताई सपकाळ, सचिन तेंडुलकर, नरेंद्र मोदी, अण्णा हजारे, बिपिन रावत अशा शेकडो रांगोळ्या टाकून रांगोळी प्रेमींची वाहवा मिळवली आहे. आषाढी एकादशी निमित्त टाकलेली श्री विठ्ठलाची रांगोळी औरवाडकर यांचा लौकीक वाढवणारी आहे. अजित औरवाडकर यांनी याच महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त टाकलेली राज्याभिषेक रांगोळी त्यांची आतापर्यंत सर्वात मोठी कलाकृती ठरली होती.
No comments:
Post a Comment