सामाजिक सलोखा राखण्यासाठी राजर्षी शाहूंच्या विचारांची गरज - प्रा. ए. डी. कांबळे, चंदगड महाविद्यालयात राजर्षी शाहू जयंती - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2023

सामाजिक सलोखा राखण्यासाठी राजर्षी शाहूंच्या विचारांची गरज - प्रा. ए. डी. कांबळे, चंदगड महाविद्यालयात राजर्षी शाहू जयंती

 

चंदगड महाविद्यालयात राजर्षी शाहू जयंती कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथे खेडूत प्रबोधिनी व इतिहास विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर पाटील यांचे हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

     कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे प्रा. ए. डी. कांबळे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी बहूजन समाजात शेतीचा विकास, जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती इत्यादी क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्यामुळे जागृती घडून आली. तसेच संपूर्ण भारत देशामध्ये सामाजिक सलोख्याचे शिक्षण राजर्षी छत्रपती शाहू राजांनी दिले. आजच्या कठीण प्रसंगी या सामाजिक सलोख्याची नितांत गरज आहे. शिक्षण आणि स्वावलंबन ही प्रगतीची दोन साधने असून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. जो शिकला तो तरला, नाही शिकला तो मातीला मिळाला असे सांगितले. 

        प्रास्ताविक प्रा. टि. एम. पाटील यांनी केले. डॉ. आर. ए. कमलाकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची जनजागृती करावी असे सांगितले.

        कार्यक्रमास डॉ. पी. एल. भादवणकर, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. एन. एस. मासाळ व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व प्रशासकिय सेवक उपस्थित होते. आभार डॉ. एम. एम. माने यांनी मानले.

No comments:

Post a Comment