चंदगड येथे मनसेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक, चंदगड विधानसभा रणनितीबाबत चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2023

चंदगड येथे मनसेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक, चंदगड विधानसभा रणनितीबाबत चर्चा

`नाका तिथे शाखा आणि गाव तिथे पदाधिकारी` असे अभियान राबविणार

चंदगड येथे बैठकीवेळी उपस्थित मनसेचे पदाधिकारी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

 चंदगड येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये विधानसभेसह येणाऱ्या सर्व निवडणुका जोमाने लढविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. चंदगड येथील सरकारी विश्राम गृह येथे हि बैठक पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले होते.

अरविंद घेवडे यांनी जमलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. मनसेच्या वतीने चंदगड विधानसभेसाठी ॲड. प्रशांत अनगुडे हे रिंगणात उतरणार असून राज ठाकरेच्या सूचनेप्रमाणे `नाका तिथे शाखा आणि गाव तिथे पदाधिकारी` असे अभियान राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राजाराम पाटील, गणराज पाटील, आरमान दड्डीकर, पुनम भादवणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment