चंदगड / प्रतिनिधी
अडकुर (ता. चंदगड) या येथील आकाश सुरेश घोरपडे या युवकाने खोटा व बनावट धनादेश दिल्याची लेखी फिर्याद दिपक विजय रावराणे (अडकूर) यांनी गडहिंग्लज येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केली होती. त्याप्रमाणे समरी क्रिमिनल केस नं. १७ / २०२१ ही दाखल झाली होती. सदर केस गुण दोषावर चालुन अंतिमता दि .०२ / ०५/२०२३ रोजी आरोपीचे वतीने ॲड. विजय कडुकर यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राहय मानून सबळ पुराव्या अभावी आरोपीची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. टी. खराडे यांनी निर्दोष मुक्तता केली.
No comments:
Post a Comment