प्रा. सुषमा सुभेदार सेट परिक्षा उत्तीर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2023

प्रा. सुषमा सुभेदार सेट परिक्षा उत्तीर्ण

प्रा. सुषमा सुभेदार
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सहायक शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या प्रा. सुषमा सुभेदार या महाराष्ट्र शासना मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या सेट(State eligibility test) परीक्षा भौतिकशास्त्र या विषयातून उत्तीर्ण झाल्या. एका सामान्य शेतकरी कुटंबात व प्रतिकूल परिस्थितीत उच्चशिक्षित होवून जिद्दीने त्यांनी हे यशाचे शिखर सर केले.

        त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बि. डी. अजळकर, पती शिरिषकुमार पाटील, भाऊ संभाजी सुभेदार, इतर प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील व सचिव विशाल पाटील यांनी या यशाबद्दल प्रा. सुभेदार यांचे कौतुक केले आहे.No comments:

Post a Comment