विनायक रेडेकर |
यूजीसी मान्यताप्राप्त व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत सहाय्यक प्राध्यापक म्हणून पात्रतेसाठी साठी घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेत कुद्नुर गावचे सुपुत्र विनायक भरमू रेडेकर हे उत्तीर्ण झाले.
सदर परीक्षा २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. समाजशास्त्र विषयात ते सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते जिल्हा परिषद सातारा अंतर्गत पाटण तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिंडूकलेवाडी येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.
No comments:
Post a Comment