बागिलगे विद्यालयाचे अध्यापक राजेंद्र शिवनगेकर यांना यावर्षीचा चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2023

बागिलगे विद्यालयाचे अध्यापक राजेंद्र शिवनगेकर यांना यावर्षीचा चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार

राजेंद्र शिवनगेकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा प्रतिष्ठेचा चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार २०२३ बी.डी विद्यालय, बागिलगेचे  राजेंद्र शिवनगेकर यांना जाहिर झाला आहे.

     नोकरी सुरू तारीख - २९ डिसेंबर १९९७, शिक्षण-  B. A. Ded, मोडी लिपी अभ्यासक्रम पूर्ण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, शिकवण्याचे विषय - मराठी, भूगोल, चित्रकला, साहित्य संमेलने, निपाणी, कागल, कारदगा, कडोली, माचीगड येथील साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून उपस्थित होते. 

वृत्तपत्र लेखन ...रणझुंजार ,पुढारी

इलेक्ट्रॉनिक मीडिया... B News ,CL News,CLमाझा, महाराष्ट्र माझा24

       कथाकथन आतापर्यंत २६५ प्रयोग यशस्वी, आकाशवाणी सांगली केंद्रावरून काव्यवाचन, चंदगडी भाषेच्या विकासासाठी वेगवेगळ्या टी. व्ही. चॅनलच्या माध्यमातून भाषेचा प्रसार, विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन व मार्गदर्शन, विज्ञानातील चमत्कार (जादूचे प्रयोग) १६३ प्रयोग यशस्वी एक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. 

No comments:

Post a Comment