नव्या शैक्षणिक धोरणावर मंगळवारी कोल्हापूर येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2023

नव्या शैक्षणिक धोरणावर मंगळवारी कोल्हापूर येथे विशेष चर्चासत्राचे आयोजनकोल्हापूर, दि. ३ जुलै :

  महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी 'टीव्ही-९' मराठी आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणावर विशेष चर्चासत्राचे मंगळवार  दि. ४ जुलै रोजी दुपारी ३.३० वा. आयोजन केले आहे. हॉटेल सयाजी येथील मेघमल्हार हॉलमध्ये होणा-या या कार्यक्रमाचे उ‌द्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि समारोप प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत होईल.

        या चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ प‌द्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री प्रा. सुखदेव थोरात, 'सिम्बायोसिस चे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर. के. कामत, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीधर लोणी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके आणि उद्योजक निखिल चितळे सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment