स्पर्धा परिक्षेत ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव नसतो - तहसीलदार राजेश चव्हाण, हलकर्णी महाविद्यालयात ' महसुल सप्ताह ' युवा संवाद कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2023

स्पर्धा परिक्षेत ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव नसतो - तहसीलदार राजेश चव्हाण, हलकर्णी महाविद्यालयात ' महसुल सप्ताह ' युवा संवाद कार्यक्रम

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         ग्रामीण व शहरी असा भेदभाव स्पर्धा परीक्षेत नसतो. आवडीचे क्षेत्र निवडा ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वस्व अर्पण करा. कष्टाची तयारी ठेवा आयुष्यात समाधानी व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र आयुष्यात महत्त्वाचे. चिकाटी, प्रयत्न यांची साथ ठेवाल तर ध्येयापर्यंत पोचाल. प्रत्येक जण विविध क्षेत्रात हुशार असतो. महाविद्यालयीन जीवनात स्पर्धा परीक्षेला सामोरे जा. अनमोल वेळ वाया घालू नका एकमेकांशी तुलना करू नका. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कठोर परिक्षम करा, म्हणजे यश प्राप्ती होईल". असे प्रतिपादन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले. 

        ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात तहसिलदार कार्यालय चंदगड आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित 'महसूल सप्ताह' अंतर्गत युवा संवाद कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते.

       यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, माजी शिक्षण सभापती भरमाना गावडा, हेरे मंडल अधिकारी ए. बी. शेट्टी, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, संदीप पाटील. विक्रम कडुकर, हलकर्णी तलाठी इकबाल तांबोळी, वैभव कोंडेकर मिरवेल तलाठी, अमर साळोखे, कमल तळवार, संदीप आवण, आदी मान्यवर उपस्थित होते. 

      प्रारंभी प्रास्ताविक प्रा.शाहू गावडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आले. तहसीलदार राजेश चव्हाण यांचा सत्कार गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

   अध्यक्षीय मनोगतात बोलताना गोपाळराव पाटील म्हणाले, ``महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण दिले जाते त्याचा लाभ घ्या, ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी चिकाटी, कष्ट , जिद्द ठेवा. जिद्द ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. या काळातच आपण नियोजन केले पाहिजे. विविध क्षेत्रात आपण चमकण्याचा प्रयत्न करा. जिवनार्थी शिक्षण घ्या. ध्येय ठरवून स्वप्न पूर्ण करा."

     यावेळी प्राध्यापक,  विद्यार्थी, विद्यार्थिनी, मान्यव , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. यु. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर हर्षदा सावरे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment