'महसूल सप्ताह' निमित्त कोवाड येथे विविध दाखल्यांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2023

'महसूल सप्ताह' निमित्त कोवाड येथे विविध दाखल्यांचे वाटपचंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         महसूल सप्ताहानिमित्त कोवाड मंडलात महसूल विभागाकडून नागरिकांना विविध दाखले व इतर योजनांची मंजूर पत्रे, ७/१२ उतारे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली.

       महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा आणि शासकीय योजना याबाबत नागरिकांना अधिकाधीक माहिती व्हावी आणि त्या योजनांचा लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी आणि शासनाच्या कामाबाबत नागरिकांना विश्वास वृद्धिंगत व्हावा. यासाठी महसूल सप्ताह साजरा केला जात आहे. यामध्ये सहभागी होऊन महसूल सप्ताह यशस्वी करावा असे आवाहन मंडलाधिकारी शरद मगदूम यांनी केले.

           १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा केला जाणार आहे. कोवाड मंडल कार्यालयांतर्गत युवा संवादच्या माध्यमातून श्रीराम विद्यालयात विविध दाखल्यांचे वाटप प्राचार्य एस. टी. कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत, कोवाड ऑफिसमध्ये महसूल सप्ताह अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना लाभार्थी १३ मंजुरी पत्रे वाटप केली. तसेच शासनाच्या सलोखा योजनेअंतर्गत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच दोन प्रकरणामधील ४ लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप केले. सन २०२३-२४ चे पीक पेरा नोंद असलेले ७/१२ उतारही यावेळीही वाटप करण्यात आले.

          तलाठी प्रशांत पाटील, शुभम मुंडे, अक्षय कोळी, किरण माने, डाॅ. सुनील भंडारी, प्रवीण गवेकर, बाळकृष्ण पाटील, राजू वांद्रे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment