अप्पी पाटील, नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे- नेसरीकर भाजप मध्ये, राजकीय वर्तुळात खळबळ! - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2025

अप्पी पाटील, नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे- नेसरीकर भाजप मध्ये, राजकीय वर्तुळात खळबळ!

 

भाजप प्रवेशा वेळी चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोबत आमदार शिवाजी पाटील, राहुल चिकोडे, अप्पी पाटील, गिरीजादेवी शिंदे- नेसरीकर, सुरेश हाळवणकर आदी.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

आगामी नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केडीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष व गडहिंग्लज तालुक्यातील काँग्रेस पक्षातील एक महत्त्वाचे प्रस्थ असलेले विनायक विनायक उर्फ अप्पी पाटील तसेच नेसरीच्या सरपंच गिरजादेवी शिंदे- नेसरीकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.

या पक्षांतरामागे चंदगड चे आमदार शिवाजी पाटील यांची राजकीय खेळी महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे.  यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघ व गडहिंग्लज उपविभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

    अप्पी पाटील यांनी गतवेळची निवडणूक कॉग्रेसचे तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून शिवाजी पाटील यांच्या विरोधात लढविली होती. 2019 च्या निवडणुकीत त्यांना राजेश पाटील यांच्याकडून असा सलग दोन वेळा पराभव पत्करावा लागला होता. कर्नाटकातील बडे राजकीय प्रस्थ जारकीहोळी यांचे अप्पी पाटील मेहुणे आहेत.  जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अप्पी पाटील गटाला सन्मानजनक जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.

सरपंच नेसरीकर यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाने नेसरी जि. प. मतदार संघातील राजकारणाला कलाटणी मिळू शकते.

   अप्पी पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत  मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजपा पक्ष प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. शनिवारी दुपारी कोल्हापूरात अप्पी पाटील व गिरीजादेवी संग्रामसिंह शिंदे- नेसरीकर यांनी मंत्री चंदकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसमवेत भाजपात प्रवेश केला. अप्पी यांच्या भाजप प्रवेशाने आम. सतेज पाटील, खा. शाहू महाराज यांना धक्का बसला आहे. पक्षप्रवेश प्रसंगी आम. अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, संजयबाबा घाटगे, नाथाजी पाटील, महेश जाधव, अशोक चराटी, राहुल चिकोडे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment