तिलारी घाटात धोकादायक वळणावर पुन्हा मोठा कंटेनर अडकून वाहतूक ठप्प - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2025

तिलारी घाटात धोकादायक वळणावर पुन्हा मोठा कंटेनर अडकून वाहतूक ठप्प

 


दोडामार्ग, दि. १ नोव्हेंबर प्रतिनिधी

दोडामार्ग ते गोवा बेळगाव कोल्हापूर जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात या अगोदर देखील अवजड वाहने यांना बंदी असताना घाटातून प्रवास करताना अनेक वेळा तिलारी घाट बंद होऊन वाहतूक ठप्प होणे, प्रवासी गैरसोय या घटना वाढल्या होत्या. या अवजड गाड्या बंद होत्या. पण शनिवारी सायंकाळी अवजड कंटेनर तिलारी घाटातून गोवा दिशेने जात असताना तिलारी घाटात एका धोकादायक वळणावर अडकून पडल्याने शेकडो वाहने दुचाकी वाहने दोन्ही बाजूंनी अडकून पडली. चंदगड दोडामार्ग पोलीस अवजड वाहने यावर कारवाई करत नसल्याने या अवजड वाहनांनी पुन्हा आपला मोर्चा तिलारी घाटातून वळवला आहे. अशा वाहनावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. राञी सात वाजेपर्यंत रस्ता खुला झाला नव्हता. एस. टी. बसेस खाजगी वाहने अडकून पडली आहेत.

No comments:

Post a Comment