
सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी मुरकुटेवाडी येथे पकडलेला नाग साप
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथील रहिवाशी संदीप कृष्णा इंजल यांच्या घरी काल दि. 30/ 10/ 2025 रोजी रात्री बारा वाजता घरासमोरील खोलीत वाळूच्या पिशव्यांमध्ये विषारी नाग दिसला. घरातील सर्व जण भयभीत झाल्याने वन खात्याच्या यशवंतनगर कार्यालयात व ढोलगरवाडी सर्पशाळेत फोनवरून कळवले. सर्प शाळेचे प्रमुख प्रा. सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी रात्री बारा वाजता तिथे जाऊन नागाला सीताफिने पकडले. पकडलेल्या सापाला यशवंत नगर येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जंगलात सोडण्यात आले. यावेळी अनिल हिशोबकर, आप्पाजी कांबळे, सागर कांबळे यांचे सहकार्य लाभले. इतक्या रात्री मदतीला धावून आल्याबद्दल इंजल कुटुंबीय, मुरकुटेवाडी ग्रामस्थ व वन विभागाच्या वतीने सर्पमित्र सदाशिव पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment