डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांना जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2023

डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांना जाहीर

गणपतराव पाटील 

गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा

          गडहिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळ  व डॉ. घाळी  प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. यावर्षीचा डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार शिरोळ येथील दत्त सहकारी उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव अप्पासो पाटील यांना जाहीर झाला आहे.

       क्षारपाड जमीन प्रकल्प राबवून गणपतराव पाटील यांनी कृषी, बँकिंग, सहकार,साखर उद्योग यासह सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी केल्याची नोंद घेत डॉ.घाळी प्रतिष्ठानच्या वतीने  त्यांचा सन्मान करण्यात येणार  आहे.

       डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता घाळी कॉलेज  सभागृह  गडहिंग्लज येथे प. पु. श्रीमान शिवलिंगेश्वर महास्वामीजी  सिद्ध संस्थान निडसोशी मठ यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश घाळी यांनी  दिली. 

       पुरस्कार निवड समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे पत्रकार परिषदेमध्ये शुक्रवारी घोषणा करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप रोख २५ हजार रुपये, मानपत्र,  सन्मान चिन्ह,  शाल व श्रीफळ असे आहे. गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील वीस हजार हेक्टर अधिक क्षेत्र क्षारपड युक्त नापीक जमिनीवर विविध  प्रयोग करून  क्षारपड जमिनी सुधारण्यात यश मिळवले आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश  घाळी यांनी  स्पष्ट केले.

       यावेळी उपाध्यक्ष अरविंद  कित्तूरकर,  सचिव ड. बाबूराव भोसकी, सी. ए. गजेंद्र  बंदी, शिवयोगी घाळी, प्राचार्य मंगलकुमार पाटील, डॉ. प्रा. सुनील देसाई  आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment