जंगमहट्टी प्रकल्प "ओव्हरफ्लो, परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2023

जंगमहट्टी प्रकल्प "ओव्हरफ्लो, परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार

जंगमहट्टी प्रकल्प "ओव्हरफ्लो`` झाल्यानंतर सांडव्यावरुन वाहणारे पाणी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          जंगमहट्टी (ता. चंदगड)  येथील मध्यम प्रकल्प शुक्रवारी दुपारी वाजता ओवरफ्लो झाला. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी होनहाळ नाल्यात पडत आहे. 

     जंगमहट्टी मध्यम प्रकल्पाची क्षमता १.२२  टीएमसी इतकी आहे. म्हणजेच (३४.८३७ द.ल.घ.मी) १२२३.६६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा या प्रकल्पात होतो. मागच्या आठवड्यात ८७ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र आठच दिवसात हा प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. जंगमहट्टी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय व सांडव्यावरून पाणी पडल्याशिवाय आज पर्यंत होनहाळ नाल्याला कधीही पूर आला नव्हता. हा प्रकल्प गेल्यावर्षी ३० जूलै रोजी भरला होते. पावसाने पाच दिवस उसंत घेतल्यामुळे या वर्षी हा प्रकल्प पाच दिवस उशीराने हा प्रकल्प ओव्हरफ्लोव झाला. हा प्रकल्प भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा शेती, आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  मिटला आहे.

No comments:

Post a Comment